Talegaon-Chakan Road : तळेगाव-चाकण महामार्गावरील वाहतूक समस्या महिना अखेरपर्यंत सोडविणार; प्रशासनाचा दावा

एमपीसी न्यूज- तळेगाव-चाकण महामार्गावरील (Talegaon-Chakan Road) मराठा क्रांती चौक येथे आज दि.13 रोजी चाकण तळेगाव  महामार्ग कृती समिती  जनसेवा विकास  समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.आतापर्यंत अपघातात  मृत्युमुखी  पडलेल्या  जीवांसाठी आदरांजली देखील वाहण्यात आली व रस्त्याच्या समस्येबाब गांभीर्याने दखल घ्यावी म्हणून आंदोलकांद्वारे लेखी निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी घोषित होऊन जवळपास 5 वर्षे उलटली तरीही या महामार्गाचे काम लाल फितीत अडकले आहे. अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सामान्य नागरिकांना दिलासा मिळत नसून वाहतूक विभागाच्या अनास्थेमुळे महामार्गावरील (Talegaon-Chakan Road) अपघातांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. प्रशासनाच्या ढिम्म कार्यपद्धतीला जागे करण्यासाठी तळेगाव मधील विविध संघटनांनी एकत्र येत  ठिय्या आंदोलन केले व जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले जाईल असा सज्जड इशारा आंदोलकांनी दिला.

Childrens day : संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने बालदिन उत्साहात साजरा

एनएचएआय चे अधिकारी दराडेसाहेब यांनी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत रस्त्यालगत असलेले सर्व अनधिकृत अतिक्रमण  काढणार असल्याचे सांगितले व 31 डिसेंबरपर्यंत नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काम सुरु करणार असल्याचे सांगितले, जर कामाला सुरुवात झाली नाही (Talegaon-Chakan road) तर मी स्वतः येऊन सर्वांची माफी  मागेन असेही ते म्हणाले. तसेच पुणे ग्रामीण वाहतूक शाखेचे अधिकारी माने साहेब यांनीही अवजड वाहनांची वाहतूकी संदर्भात येत्या दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन समस्या सोडविणार असल्याचे संकेत दिले.

दरम्यान आंदोलनामध्ये तळेगाव-चाकण महामार्ग कृती समिती,जनसेवा विकाससमिती, तळेगाव शहर विकास संघ,लायन्स ग्रुप ऑफ तळेगाव, जागरूक नागरीसंघ तळेगाव व आदी संघटनाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

  • तळेगावातील अवजड वाहन प्रवेश बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी. किंवा ती रद्द करावी.अथवा पर्यायी मार्ग म्हणून सर्व अवजड वाहतूक तळेगाव एमआयडीसी मार्गे चाकणकडे वळवावी.
  • अवजड वाहन प्रवेशबंदी धाब्यावर बसवून चिरीमिरी घेऊन वाहने सोडून,अपघातांत कारणीभूत तळेगाव वाहतूक विभाग आणि वडगाव मावळ वाहतूक नियंत्रण शाखेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
  • अस्तित्वातील तळेगाव-चााकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करुन सहा पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.