Money Fraud : नेस्ले कंपनीत कामाला लावतो म्हणून अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नेस्ले कंपनीत कामाला लावतो म्हणून एकाकडून आरोपीने अडिच लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार 6 ऑक्टोबर 2020 ते 27 मे 2022 या कालावधीत चिखली येथे घडला आहे.

याप्रकर्णी पंकज प्रभाकर ओझरकर (वय 39 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वेगवेगळ्या मोबाईल व अक्सीस बँकेचा खातेधारक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Facebook fraud : फेसबुकवरून लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घालणारा गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेस्ले कंपनीत जॉब लावतो म्हणून आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला. तसेच फिर्यादी यांच्यकडून वेळोवेळी असे तब्बल 2 लाख 52 हजार 120 रुपये काढून घेतले. मात्र नोकरी लावली नाही. फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता त्यांनी पोलीस ठाणे गाठले. चिखली पोलीस याचा पुढिल तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.