MPC News Quiz Final Result : देवीचा जागर  प्रश्नमंजुषा – ‘हे’ आहेत नऊ महाविजेते!

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज आयोजित ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा’ या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेला एमपीसी न्यूजच्या वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सर्व दिवस भाग घेऊन 27 प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकांमधून नऊ भाग्यवान महाविजेत्यांची निवड (MPC News Quiz Final Result) करण्यात आली आहे.  या नऊ महाविजेत्यांना स्पर्धेचे प्रायोजक तळेगाव दाभाडे येथील ‘भगवती ज्वेलर्स’च्या वतीने एक चांदीचा कुंकवाचा करंडा बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत दररोज तीन प्रश्न विचारण्यात येत होते. तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांमधून दररोज एक भाग्यवान विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात येत होती. या नऊ विजेत्यांची नावे यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहेत. या खेरीज नऊही स्पर्धेत सहभागी होऊन सर्व म्हणजे 27 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या एकूण 56 स्पर्धकांमधून आज विजयादशमीच्या मुहूर्तावर नऊ भाग्यवान महाविजेत्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड (MPC News Quiz Final Result) करण्यात आली.

या स्पर्धेसाठी प्रश्न संकलनाची जबाबदारी प्रभाकर तुमकर यांनी पार पाडली. भीम मागाडे यांनी स्पर्धेसाठी तांत्रिक सहाय्य केले.

देवीचा जागर ऑनलाईन प्रश्नमंजुषा – महाविजेत्यांची नावे (MPC News Quiz Final Result)

1) सपना संदीप खटके

बालाजी हाऊसिंग सोसायटी,

विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी

2) अश्विनी अविनाश गोखले

अशोक विक्रम सोसायटी,

घोरावडी स्टेशनजवळ, तळेगाव दाभाडे

3) अजय विनायक माने

गुरुकृपा कॉलनी, दिघी रोड,

भोसरी

4) भगवान पाणीग्राही

स्वामी समर्थनगर, दिघी रोड,

भोसरी

5) साक्षी महेश म्हस्के

लक्ष्मीनारायण सोसायटी, चिखली रोड,

कस्तुरी मार्केट जवळ, महात्मा फुलेनगर,

चिंचवड

6) सीमा जग्गू राठोड,

सुतारवाडी, पाषाण, पुणे- 21

7) किशोर शाहु मुजमुले

सुदर्शन कॉलनी नंबर एक, कैलासनगर,

थेरगाव

8) नेहा विजय बिर्जे

एलआयसी कॉलनी, सेक्टर 25,

प्राधिकरण, निगडी

9) अमृता तन्मय शिंदे

संस्कृती अपार्टमेंट, गजानन महाराज मंदिराजवळ,

तुकारामनगर, तळेगाव दाभाडे

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी ‘एमपीसी न्यूज’च्या चिंचवड कार्यालयात होणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती सर्व विजेत्यांना आणि महाविजेत्यांना वैयक्तिक संपर्क साधून कळविण्यात येईल, असे ‘एमपीसी न्यूज’चे मुख्य संपादक विवेक इनामदार यांनी सांगितले.

Today’s Horoscope 5 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.