Pune Crime News : पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागातील दोघांना लाच घेताना अटक

एमपीसी न्यूज – महापालिकेतील बंडगार्डन पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता आणि लिपीकाला 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune Crime News) पकडले. पाण्याच्या टॅंकरला पास देण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याचे एसीबीने सांगितले.

 

उपअभियंता मधुकर थोरात आणि लिपीक अजय मोरे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.तक्रारदार यांचे पाण्याचे टॅंकर आहेत. पालिकेकडून पाणी टॅंकर पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा विभागाकडून पाणी वाटप टॅंकरला पास दिला जातो. हा पास देण्यासाठी तक्रारदारांकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

 

Staff Nurse Recruitment Postponed : महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश;यशवंतभाऊ भोसले यांची माहिती

 

याबाबत तक्ररदारांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार सायंकाळी सापळा रचून केलेल्या कारवाईत या दोघांना 20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.