Pune News : पुण्यात भरणार दोन दिवसीय ‘तुलिका’हे आगळे-वेगळे कला प्रदर्शन

एमपीसी न्यूज – चेतन प्रकाश आणि नितीन हेरेकर यांचे ‘तुलिका’ हे कला प्रदर्शन दि. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान  पुण्यातील गोखलेनगर येथील दर्पण आर्ट गॅलरी येथे (Pune News) होणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आंतरराष्ट्रीय कलाकार आणि शिल्पकार सचिन खरात यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी खासदार वंदना चव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून तर कुशल व्यंगचित्रकार आणि गुंतागुंतीच्या लाकडी कलेतील आंतरराष्ट्रीय कलाकार चारुहास पंडित तसेच पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल उपस्थित राहणार आहेत.

 

Women’s Premier League 2023 : महिला आयपीएलचं वेळापत्रक जाहीर! 4 मार्चपासून रंगणार थरार

या कला प्रदर्शनात दोन भिन्न कलाकारांची वेगवेगळी कला, रंगांचे फटकारे यांच्या शैली रसिकांना पाहता येणार आहेत. या दोन्ही कलाकारांच्या कला शैली भिन्न आहेत. (Pune News) या दोन्ही कलाकारांची वेगवेगळी पार्श्वभूमी आहे, परंतू त्यांची आवड समान आहे. प्रदर्शनातील चित्रे जिवंत आणि सुंदर कलाकृती आहेत.

चेतन प्रकाश हे एक स्वयंशिक्षित कलाकार आहेत. ज्यांनी 40 वर्षांच्या अंतरानंतर आपली चित्रकलेची आवड पुन्हा सुरू केली. ते बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावरुन निवृत्त झाले आहेत. कॅनव्हासवर अ‍ॅक्रेलिक पेंटिंगला प्राधान्य देणारे ते कलाकार आहेत. तरी नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.