Pune : गर्दीचा फायदा घेत पीएमपी बस प्रवाशांचे मोबाईल चोरणा-या दोन चोरट्यांना अटक

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणा-या दोन चोरट्यांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.26) पंचमी हॉटेल ते दांडेकर पूल या मार्गावर जाणाऱ्या बसमधून करण्यात आली.

अक्षय दत्ता जाधव (वय २१ वर्ष,रा.सर्वोदय कॉलनी,चाळ नंबर ३६ मुंढवा पुणे२) हृतिक गजेंद्र जाधव (वय १९वर्ष रा. लिंबेवाडी सोलापूर), अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

सध्या शहरात बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांच्या होणाऱ्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेऊन मोबाईल चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये बसमध्ये पोलिसांनी पीएमपीएमएलच्या बसमध्ये साध्या वेशात गस्त घालण्यास सुरुवात केली.

दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष सूर्यवंशी व राणोजी ढवळे हे रविवारी पंचमी हॉटेल ते दांडेकर पूल या मार्गावरून जाणाऱ्या बसमध्ये गस्त घालत असताना दोन्ही आरोपी संशयित रित्या बसमध्ये हालचाल करत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी संशयावरुन अक्षय व हृतिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल बाबत माहिती विचारली. मात्र, याबाबत त्यांना अधिकृत व विश्वास ठेवावा अशी माहिती सांगता आली नाही.

त्यामुळे त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या समोर उभे केले असता त्यांनी केलेल्या चौकशीत यापूर्वी त्यांनी पंचमी हॉटेल जवळील बस स्टॉप वर बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलेचा मोबाईल चोरला असल्याची कबुली दिली. त्यावरून अक्षय आणि हृत्विकला दोघांनाही अटक करण्यात आली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.