Pune : सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त

मेदनकरवाडी येथे कारवाई

एमपीसी न्यूज – बेकायदा घातक शस्त्र जवळ बाळगणाऱ्या मेदनकरवाडी (ता. खेड) येथील मार्तंडनगरमधून बेचाळीस वर्षीय सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
संदीप अरुण शिंदे ( वय – ४२ वर्षे, रा. मेदनकरवाडी, मार्तंडनगर, ता. खेड), असे संबंधित सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.


शिंदे याला २९ मे, २०१९ रोजी काही गंभीर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. त्याला त्यामध्ये पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या राहत्या घरात किचन रूममध्ये तसेच येथील हर्षद ग्यास रिपेअरिंगमध्ये लपवून ठेवलेले दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे काढून दिली. ती शस्त्रे चाकण पोलिसांनी जप्त केली आहेत.
संदीप शिंदे याच्यावर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात अनेक किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.  चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.