Pune : रिक्षाचालकासह दोन अनोळखी इसमांनी एकावर चाकुने वार करून लुटले

एमपीसी न्यूज – रिक्षाचालकासह दोन अनोळखी इसमांनी एकावर चाकुने वार करून लुटले. ही घटना शनिवारी (दि.8) रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान उंड्री येथे क्लाऊड नाईनच्या शेजारी टेकडीच्या बाजुला मोकळ्या परिसरात घडली. याप्रकरणी मानया बसन्नादोरी (वय 40, रा. यादगिरी, कर्नाटक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मानया हे भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते पुण्याला आले होते. नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी हपडसरमधील महमंदवाडी येथे त्यांच्या मेव्हणीच्या घरी जात रिक्षात बसून जात होते. यावेळी रिक्षेतील दोन अनोळखी इसमांनी त्याला उंड्रीतील क्लाऊड नाईन टेकडी जवळ घेऊन गेले. तेथे त्याला रिक्षातून उतरवून आधीच हजर असलेल्या एका रिक्षा चालकाजवळ नेऊन फिर्यादी यांच्याकडील 24 हजारांची रोख रकम व मोबाईल असा एकूण 26 हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन फिर्यादी यांना चाकुने डाव्या हातांच्या दंडावर पंजावर व डाव्या गालावर वार करून जखमी केले.

मानया यांच्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालक व दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.