Hinjawadi : दोन दुचाकींच्या धडकेत दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज – दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. ही घटना कासारसाई येथे घडली.

नीलेश सोपान शिंदे (रा. चांदखेड, ता. मावळ), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दुचाकीस्वाराचे नाव आहे. बारकू लक्ष्मण गायकवाड, दत्तात्रय श्‍यामराव गायकवाड (वय 45, रा. चांदखेड, ता. मावळ), अशी जखमी दुचाकीस्वारांची नावे आहे. दत्तात्रय यांनी शनिवारी (दि. 16) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी गायकवाड आणि त्यांचा लहान भाऊ बारकू हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. ते कासारसाई येथे आले असता समोरून भरधाव वेगात आलेल्या नीलेश यांच्या दुचाकीने दत्तात्रय यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दत्तात्रय हे किरकोळ जखमी झाले. तर त्यांचा भाऊ बारकू हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.