Vadgaon Maval : सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी एकजूट करा – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या माध्यमातून सहकारी क्षेत्र मोडीत काढण्यासाठी धोरण राबविले जात असून या धोरणाला विरोध करण्यासाठी आपली एकजूट झाली पाहिजे, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.

वडगाव येथील पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात महाराष्ट राज्य सहकारी संघ, पुणे जिल्हा सहकारी बोर्ड, पुणे जिल्हा बँक, सहाय्यक निबधंक सहकारी संस्था, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ व डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त सहकार्याने ६६ व्या आखिल भारतीय सहकारी सप्ताहानिमित्त तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रंसगी शेळके बोलत होते.

या प्रसंगी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, पुणे पीपल्स को- आॅप. बँकेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, शोभा कदम, कुसुम काशीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माऊली गोणते, ज्येष्ठ नेते महादु कालेकर, माजी सभापती गणपत शेडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनमंत्री नारायण ठाकर, राष्ट्रवादी महीला अध्यक्षा राजश्री राऊत, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, मावळ तालुका राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष (ग्रामीण) कैलास गायकवाड, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनिल भोंगाडे, ज्येष्ठ नेते वि म शिंदे, माजी सरपंच चंद्रकांत दहिभाते, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार सेलचे अध्यक्ष नामदेव शेलार, खाद्यी ग्रामोद्योग संघाचे उपाध्यक्ष गणेश भांगरे, डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शरद भोंगाडे, सहकारी बोर्डाचे सुनिल जगताप व नेवसे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

शेळके पुढे म्हणाले की प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे काम केले पाहिजे त्यासाठी सहकार क्षेत्र टिकले पाहिजे. तालुक्यातील काही राजकारणी मंडळींनी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी स्वार्थासाठी काही बोगस संस्था स्थापन केल्या असून अशा राजकारण्यांपासून पदाधिका-यांनी दूर राहावे, असे सांगितले.

बबनराव भेगडे यांनी सहकार क्षेत्रामुळे महाराष्ट्र अग्रभागी असून सहकार हा सर्व सामान्य जनतेचा मदतीचा हात आहे.
यासाठी सहकार टिकले पाहिजे, असे आवाहन केले.

यावेळी महादू कालेकर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाले असून मावळला अजूनपर्यंत अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही तरी जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांना अध्यक्ष पदासाठी तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करण्याची मागणी केली. सूत्रसंचालन नगरसेवक चंद्रजीत वाघमारे यांनी तर आभार संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.