Vadgaon : विकसित भारत संकल्प यात्रेत वडगाव शहरातील 300 नागरिकांचा सहभाग

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या प्रमुख योजनांचे (Vadgaon) लाभ जनसामान्यांना मिळावेत यासाठी वडगाव शहरातील श्रीमंत सरदार महादजी शिंदे उद्यान येथे ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात 300 नागरिक सहभागी झाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांबाबत माहिती घेतली. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), दिव्यांग बांधव कल्याण निधी योजना, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, बँकांचे विविध कर्ज योजना, आधार कार्ड नोंदणी, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला बचतगट, स्वच्छ भारत अभियान इत्यादी नागरी भागातील योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

Pune Breaking : लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; भर दिवसा झाला होता गोळीबार

कार्यक्रमाचे नियोजन वडगांव नगरपंचायतीने केले होते. नगरपरिषद (Vadgaon), नगरपंचायत क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.