Vadgaon : शहरातील 1287 कुटुंबातील 3860 लाभार्थ्यांना शरद योजनेचा लाभ

एमपीसीन्यूज – समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून व वडगाव नगरपंचायतीच्या वतीने आज वडगाव परिसरातील लाभार्थ्यांना ‘शरद भोजन योजना’ अंतर्गत धान्य वाटप करण्यात आले. शहरातील 1287 कुटुंबातील 3860 लाभार्थ्यांना  या योजनेचा लाभ मिळाला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण ‘ शरद भोजन योजना ‘ सुरु केली.

ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशी कोणतीही व्यक्ती उपाशी राहणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ही योजना सुरु करण्यात आली आहे.  यामध्ये गरजू कुटुंबाना धान्य देण्याची व्यवस्था पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व वडगाव नगरपंचायतच्यावतीने करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आजपासून पाच दिवसांत सर्व प्रभागातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून शासनाने अल्प दरामध्ये दिलेल्या धान्याची रक्कम प्रभागातील लाभार्थ्यांकडून न घेता सामाजिक बांधिलकी जपत सर्व प्रभागातील नगरसेवकांनी ही रक्कम वडगाव नगरपंचायत कार्यालयात जमा करावी, अशी विनंती नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष माया चव्हाण यांनी केली.

आमदार सुनिल शेळके यांच्या निधीतून वडगाव शहरवासियांसाठी २४ हजार मास्क देण्यात आले. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात मास्क वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी उपसभापती गणेश ढोरे, ज्येष्ठ नेते सुभाषराव जाधव, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, अॅड अशोक ढमाले, सुनिल चव्हाण, गोरख ढोरे, अरुण चव्हाण, चंद्रकांत ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष माया चव्हाण, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, नगरसेविका शारदा ढोरे, प्रमिला बाफना, पूनम जाधव, पूजा वहिले, सायली म्हाळसकर व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शरद ढोरे, गणेश जाधव, भाऊसाहेब ढोरे,आफताब सय्यद, प्रविण ढोरे, सुनिल दंडेल, हर्षल ढोरे, अतुल राऊत, सोमनाथ धोंगडे, सुनिल चव्हाण, अक्षय रौंधळ, शैलेश वहिले तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.