Pimpri: कोरोना योद्धा ‘वायसीएमएच’मधील डॉक्टरचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

Doctor tests positive for coronavirus from YCMH.

0

एमपीसी न्यूज – कोरोनाविरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरचे आज (शनिवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना योद्धा डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हे डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांचे वय 30 आहे. कोरोना बाधित रुग्णांवर ते उपचार करत होते.

त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाची लढाई लढणा-या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, यापुर्वीही एका खासगी डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. त्या डॉक्टरने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like