Vadgaon : भाजपाच्यावतीने पोलिसांना कोरोना संक्रमण प्रतिबंधक किटचे वाटप

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आणि व्यापारी आघाडी यांच्या वतीने वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच व प्रायव्हेट क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या परिचारिका यांना कोविड १९ – कोरोना संक्रमण प्रतिबंधक किटचे वाटप करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, भाजपा शहराध्यक्ष किरण भिलारे, ज्येष्ठ नेते अरविंद पिंगळे, पंढरीनाथ भिलारे, सोमनाथ काळे, महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे, पोलीस उपनिरीक्षक शिला खोत आदी उपस्थित होते.

तसेच भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष भूषण मुथा, प्रसिध्दी प्रमुख अनंता कुडे, गटनेते नगरसेवक दिनेश ढोरे, प्रविण चव्हाण, अॅड.विजय जाधव, किरण म्हाळसकर, शामराव ढोरे, दिलीप म्हाळसकर, सुनीता भिलारे, पोलीस कर्मचारी गणेश तावरे, कविराज पाटोळे, दिपक गायकवाड, महेंद्र म्हाळसकर, गणेश भेगडे, वसंत भिलारे, खंडूशेठ भिलारे, शंकर भोंडवे, शेखर वहिले, पवन दंडेल, प्रकाश बोत्रे आदी उपस्थित होते.

या किटमध्ये वॉशेबल व इतर मास्क, सॅनिटायझर, साबण, फरशी पुसण्याचे फिनाईल, अँटीसेप्टिक लिक्विड इत्यादींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.