Vadgaon Crime : तिरुपतीनगर (साते) हद्दीत एकाच दिवशी पाच घरफोडींची घटना

एमपीसी न्यूज – तिरुपतीनगर (साते) हद्दीत कुलूपबंद असलेल्या पाच घरांमध्ये घरफोडी केल्याची घटना घडली. ही घटना सोमवार (दि.23) रोजी पहाटे 3.30 च्या पूर्वी झाली. एकूण 48 हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबात आप्पासाहेब बाळासाहेब काळुसे (रा. तिरुपती नगर साते ता. मावळ) यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता बापू धकतोडे यांच्या घराचे कुलूप तोडून अर्धा तोळा सोन्याची अंगठी, चार ग्राम सोन्याची साखळी व साड्या, बबन पारटे यांच्या घरातील रोख 12 हजार रुपये, आप्पासाहेब काळुसे यांच्या घरातून मंगळसूत्र विशाल सुरेश चव्हाण व अशोक वारे यांच्या घरातील साहित्य फेकाफेकी करून नुकसान केले.

एकाच दिवशी पाच घरे फोडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे.

दिवाळी सुट्ट्या असल्याने कुलूपबंद घरे फोडली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक संतोष चामे, दिलीप देसाई, कर्मचारी गणेश तावरे, मनोज कदम, अजित ननावरे व नागरिक दत्ता शेळके, शरद साळुंके उपस्थित होते.

या गुन्ह्याचा पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे करत आहेत. घटनास्थळी फिंगर प्रिंट पथक पाचारण केले तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीत चोरटे कैद झाली असून लवकरच चोरट्यांना अटक करणार असल्याचे आश्वासन चामे यांनी दिले.

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर म्हणाले नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत तसेच ग्रामसुरक्षा दल नेमून रात्र गस्त करावी. संशयित वस्तू व लोकांच्या हालचाली बाबत पोलीसांना माहिती द्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.