Vadgaon Maval : अंत्योदय योजनेचा दिव्यांगांना लाभ मिळावा ; मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील दिव्यांग(अपंग) व्यक्तींना तसेच विधवा, दुर्धर आजारग्रस्त, 60 वर्षावरील वृद्ध (निराधार) यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी व मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात अंत्योदय योजनेस पात्र ठरणा-या दिव्यांग, विधवा, दुर्धर आजारग्रस्त 60 वर्षावरील निराधार वृद्ध अशा व्यक्तींची संख्या जास्त असून अशा लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, संघटनमंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनील चव्हाण, दिव्यांग आघाडी तालुका अध्यक्ष विकास लिंभोरे, राहुल कराळे,राजू शिंदे,संतोष राजिवडे, गणेश भांगरे,अमोल भोईरकर,दिलीप गावडे,अमोल धिडे,किसनराव गावडे, ज्ञानेश्वर गुंड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.