Vadgaon Maval : ग्रामीण पत्रकार संघाच्या सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार भारत काळे

खजिनदारपदी दतात्रय म्हाळसकर

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या सचिवपदी सकाळचे ज्येष्ठ पत्रकार भारत काळे यांची तर खजिनदारपदी महाराष्ट्र लाईव्ह वन चॅनलचे संपादक दतात्रय म्हाळसकर यांची निवड करण्यात आली.

वडगाव मावळ येथे संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर केल्या. निवडीबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे, सुदेश गिरमे, गणेश विनोदे, उपाध्यक्ष सचिन शिंदे, रामदास वाडेकर, बाळासाहेब भालेकर, सचिन ठाकर, चंद्रकांत लोळे, धनंजय खाडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.