Vadgaon Maval : मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत उमेदवार मारुती असवले यांची माघार

महायुतीच्या क वर्गातील उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत उमेदवार ( Vadgaon Maval)  मारूती तुकाराम असवले यांनी माघार घेतली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या महायुतीच्या क वर्गातील उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीची मतदान प्रक्रिया होणार असून महायुतीच्या पॅनलला मतदारांनी मतदान करावे असे आवाहन असवले यांनी केले आहे.

मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या क वर्गातील उमेदवारांना या निवडणुकीतील उमेदवार मारूती तुकाराम असवले यांनी जाहीर पाठिंबा दिला.रविवार ता.25 फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलला मतदारांनी मतदान करावे असे आवाहन असवले यांनी केले. असवले यांनी महायुतीला पाठिंबा देणारे पत्र महायुतीच्या उमेदवारांना दिले असून हेच पत्र प्रसिद्धीस दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप व शिवसेना या महायुतीच्या सहकार पॅनलचे उमेदवार किरण हुलावळे यांच्यासह अमोल केदारी,मारूती असवले,बाळासाहेब कोकाटे, भीमराव पिंगळे,अनिल असवले,भूषण असवले, चंद्रकांत वाघमारे, गणपत असवले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Today’s Horoscope 21 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

असवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,मी श्री. मारुती तुकाराम असवले रा. टाकवे बु!! ता. मावळ जि. पुणे येथील रहिवाशी असुन मावळ तालुका खरेदी – विक्री सहकारी संस्था खडकाळेची संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असल्याने मी क वर्ग प्रतिनिधी या जागेसाठी उमेदारी अर्ज दाखल केला होता.परंतु सदर निवडणुकीमध्ये मला माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता; परंतु मला पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी माझा उमेदवारी अर्ज मागे न घेता मला निवडणुक चिन्ह दिले.

तरी मला निवडणुक लढवायची नाही. माझा महायुतीचे उमेदवार माणिक मारुतराव गाडे,किरण दौलतराव हुलावळे व गणेश मारुती विनोदे यांना पाठिंबा देत आहे.तरी माझ्या चिन्हावर शिक्का न मारता विमान या चिन्हावर शिक्का मारुन महायुतीचे उमेदवारांना बहुमताने विजय करावे अशी विनंती ही त्या पत्रात करण्यात आली ( Vadgaon Maval) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.