Talegaon Dabhade : एनएमआयईटीचा व्ही इनोव्हेट टेक्नोलॉजीस सोबत सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि पिंपरी चिंचवड एज्यकेशन ट्रस्ट ( Talegaon Dabhade) संचालित नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी महाविद्यालयाने औदयोगिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन व्ही इनोव्हेट टेक्नोलॉजीस समवेत नुकताच सामंज्यस करार केला.

या प्रसंगी व्ही इनोव्हेट टेक्नोलॉजीसचे बिजनेस ऑपेरेशन हेड योगेश खंडेलवाल, एनएमआयईटीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, मेकॅनिकल विभाचे प्रमुख डॉ. सतीश मोरे, प्रा. मनोज काटे, प्रथम विभाग प्रमुख डॉ. शेखर राहणे, प्रा. स्पंदन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Vadgaon Maval : मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत उमेदवार मारुती असवले यांची माघार

व्ही इनोव्हेट टेक्नोलॉजीस आस्थापना ही डिजिटल ट्रान्सफॉर्मशन आणि प्रोडक्ट डेव्हलपमेन्ट या क्षेत्रात कार्यरत असून आर्टिफिशिअल इंटेलिजियन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, आयओटी आदी टेक्नोलॉजी पुरविण्याचे काम करत आहेत. या करारा मार्फत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, इंटर्नशिप तसेच सी अँड सी प्लसप्लस प्रोग्रामिंग, पायथॉन प्रोग्रामिंग आदींचे ट्रेनिंगचा फायदा घेता ( Talegaon Dabhade)  येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.