Vadgaon Maval : ‘कोरोना’मुळे माजी मंत्री मदन बाफना यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचा 20 मार्च 2020 रोजी होणारा “अभिष्टचिंतन सोहळ्याचा” कार्यक्रम ‘कोरोना व्हायरस’चा वाढता प्रभाव पाहून रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले व सचिव अशोक बाफना यांनी यांनी नुकतीच दिली आहे.

यावेळी तुकाराम असवले व सचिव अशोक बाफना म्हणाले, श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ वडगाव मावळ येथे दरवर्षी 20 मार्च रोजी मदन बाफना यांचा वाढदिवस “प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. यंदा मदन बाफना यांचा 80 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार होता, परंतु कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 17 ते 31 मार्चपर्यंत सर्वच शाळा व महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

कोरोना व्हायरस चा होणारा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोत्तम असे प्रयत्न करत आहे शासनाच्या या कार्याला प्रतिसाद म्हणून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना सुट्टी देण्यात आली आहे ,शासनाच्या कोरोना व्हायरस संदर्भात निर्णयाची अंमलबजावणी व शासनास प्रतिसाद म्हणून श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ वडगांव मावळ या ठिकाणी होणारा मदन बाफना यांचा यंदाचा अभिष्टचिंतन सोहळा रद्द करण्यात आला आहे.तसेच सर्व स्टाफ, विद्यार्थी व नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे. आपले आरोग्य व स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.