Pimpri : नूपुर नृत्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात 70 पेक्षा जास्त विद्यार्थीनींनी सादर केली मनमोहक नृत्य

एमपीसी न्यूज- नूपुर नृत्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा( Pimpri )आवर्तन 2024 हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.16) आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे पार पडला. या कार्यक्रमात एकुण 70 पेक्षा जास्त विद्यार्थीनीनी सहभाग घेतला होता.

गुरू शांभवी दांडेकर व गुरू शिल्पा भोमे या प्रमुख पाहुणे( Pimpri )म्हणून उपस्थित होते. कलाकारांमध्ये प्रत्येक वेळेस नवनवीन शिकण्याची उत्सुकता असली पाहिजे आणि कलेविषयी निष्ठा आणि प्रेम ठेवले पाहिजे असे प्रतिपादन गुरु शांभवी दांडेकर यांनी केले.

Pimpri : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श राज्य निर्माण केले – आयुक्त सिंह

संचालिका डॉ. सुमेधा गाडेकर यांनी सुरूवातीला एक श्र्लोकी रामायण, ताल- गणेश आणि नवरस गतभाव प्रस्तुत केला. ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर विद्यार्थी नीनी कोळी नृत्य, गुरूअष्टकम्, अष्टनायिका , सजनी – सजनी राधिका, मन मस्त फकिरा धारी है, ताल-झपताल, कवित्व माला आदी नृत्य प्रस्तुती केली.

कार्यक्रमाची सांगता संत परंपरा या नृत्यनाटिकेने झाली ज्याला प्रेषकांनी उत्सर्फुत प्रतिसाद दिला. राहाटणी,किवळे, रावेत, बिजली नगर या चारही शाखेच्या विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.

तबल्यावर शंकर कुचेकर,संवादिनी वर उमेश पुरोहित, गायन अश्विनी तळेगावकर यांनी साथसंगत केली. निवेदन मधुवंती हसबनीस यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.