Alandi : 12 वी च्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या टर्निंग पॉईंट बद्दल अनिल लोहार यांचे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना (Alandi )बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे ह.भ.प. संदीप महाराज लोहोर(Alandi) (अध्यक्ष -भक्ती शक्ती संघ आळंदी देवाची ), प्रमुख उपस्थिती अनिल लोहार (सहाय्यक पोलीस निरीक्षक आळंदी पोलीस स्टेशन), श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मुख्याध्यापक दिपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड उपस्थित होते.

शितल बागडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अनिल लोहार यांनी 12 वी च्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या टर्निंग पॉईंट बद्दल मार्गदर्शन केले. जीवनात जिद्द आणि चिकाटी असेल तर मनुष्य प्रचंड मेहनत घेऊन जीवनात यशस्वी होऊ शकतो. पूर्वीच्या मुलांना शिक्षणाच्या एवढ्या संधींची माहिती उपलब्ध नव्हती व परंतु आधुनिक जगात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी व विविध क्षेत्रात प्रगती करता येऊ शकते यावर मार्गदर्शन केले.

Pimpri : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श राज्य निर्माण केले – आयुक्त सिंह

अजित वडगावकर यांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा असे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. दीपक मुंगसे यांनी जीवनामध्ये वाटचाल करत असताना डोळ्यासमोर ध्येय ठेवणे व त्या दृष्टीने कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पर्यवेक्षक किसन राठोड, शुभांगी जगनाडे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण जीवन जगण्याबद्दल मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात संदीप महाराज लोहोर यांनी विद्यार्थ्यांना एकपाठी असावे, बारावीनंतर विद्यार्थ्यांना जीवनात नवीन नवीन संधी येत असतात, त्या संधीचे सोने करावे तसेच विद्यार्थ्यांनी जीवनात उत्तुंग यश प्राप्त करून यशाचे शिखर गाठावे असे मत व्यक्त केले. तसेच आपण आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जीवन जगावे जे ज्ञान मिळेल ते आत्मसात करत जावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिवले व उपस्थितांचे आभार सुप्रिया फडके यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.