Pune : गच्छाधिपती आचार्य श्री.दौलतसागर सूरीश्वरजी महाराज यांचे निधन

एमपीसी न्यूज – जैन समाजातील श्रमणपरंपरेतील गच्छाधिपती (Pune)आचार्य दौलतसागर सूरीश्वरजी महाराज (वय 103) यांना रविवारी सकाळी समाधी मरण लाभले.

मुकुंदनगर परिसरातील सुजय गार्डन येथे (Pune)त्यांचे वास्तव्य होते. जैन धर्माच्या गेल्या दहा दशकांच्या परिवर्तनाचे साक्षीदार असलेल्या दौलतसागर सूरीश्वरजी महाराज यांनी देशाचा कानाकोपरा पिंजून काढला होता.

Alandi : 12 वी च्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या टर्निंग पॉईंट बद्दल अनिल लोहार यांचे मार्गदर्शन

वृद्धापकाळामुळे त्यांनी गेल्या काही वर्षांपासून विहार बंद केला होता. दौलतसागर सूरीश्वरजी महाराज यांचा जन्म जेतपूर (जि. मेहसाणा) या गावी झाला होता. शंकर पटेल हे त्यांचे बालपणीचे नाव होते. पूज्य आनंदसागर सूरीश्वरजी महाराज यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली होती.

त्यांनी आपल्या जीवनात 9 आगम मंदिरांची स्थापना केली होती. आज (सोमवारी) सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे अंतिम अग्निसंस्कार करण्यात येतील, असे आगम मंदिराचे विश्वस्त देवीचंद जैन, सुहास शहा, प्रमोद दुगड, भरत शहा, संजय परमार यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.