Pune : लायगुडे हॉस्पिटल, सणस क्रीडा मैदान येथे कोरोना संशयित रुग्णांसाठी विविध सोयीसुविधा

एमपीसी न्यूज – कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे हॉस्पिटल धायरी, सणस क्रीडा मैदान येथील वसतिगृहात करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

त्याचबरोबरच टी. व्ही. संच,गरम पाण्याकरिता गिझर व अन्य आवश्यक वस्तू येथे दाखल होणाऱ्या संशयित रुग्णांणकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.