Nigdi : कनिष्ठ अभियंता महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदावर काम करणाऱ्या महिलेला स्वतःच्या संपर्क कार्यालयात बोलावून घेऊन प्रभागात सुरू असलेल्या कामावरून शिवीगाळ केली. तसेच ‘माझ्यावर 50 गुन्हे दाखल आहेत, तू काय करणार माझे’ असे म्हणत धमकी दिली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 16) सकाळी अकरा वाजता आकुर्डी येथे घडली.

जावेद शेख (रा. दत्तवाडी, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय कर्मचारी महिलेने बुधवारी (दि. 18) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलोसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी जावेद शेख यांनी फिर्यादी कनिष्ठ अभियंता महिलेला फोन करून आपल्या आकुर्डी येथील कार्यालयात बोलावून घेतले. प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुरू असलेल्या कामावरून फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ‘कामाचा फॉलोअप मी करायचा आणि दुसरे नगरसेवक कामाचे क्रेडिट घेऊन जातील. मी 40 ते 50 गुन्हे केले आहेत. तू काय करणार आहेस माझे. मी साईटवर आल्याशिवाय एक वीट पण हलली तर तुमच्याकडे बघूनच घेईन’ अशी धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.