BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : पत्रकारांना दाखवले मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे काम सुरु आहे. आज, सोमवारी वडगाव मावळ येथे मावळ ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकारांना मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आपण ज्या चिन्हाचे बटन दाबू त्याचे छायाचित्र आपल्याला व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसते आणि मतदान झालेली स्लीप बाॅक्समध्ये पडते याची खातरजमा उपस्थित पत्रकारांनी केली. 
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे यांनी हे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी  रणजीत देसाई, नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील, मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा, माजी अध्यक्ष व दै पुण्यनगरीचे सुदेश गिरमे, माजी अध्यक्ष व सकाळचे ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे, दै पुढारीचे पत्रकार व मावळ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश विनोदे आदी पत्रकार उपस्थित होते.
या प्रात्यक्षिकामुळे मतदानाविषयी अनेकजणांचा असलेला गैरसमज दूर होणार आहे. मतदानाची स्लीप मशीनच्या बाॅक्स मध्ये पडते. तरीदेखील काही शंका असल्यास मशीनमध्ये होणारे मतदान व बाॅक्समध्ये पडलेल्या मतदानाच्या स्लिपा मोजता येणार आहेत.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.