BNR-HDR-TOP-Mobile

Pune : मेंदूच्या क्रिया आणि ‘मेंदूंच्या कार्यकरी विश्लेषण’ तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद

'टेन्शन फ्री भारत' मोहिमेत 371 रुग्णांना लाभ

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज- ‘ब्रेनमॅ्पींग इंडिया फोरम क्लिनिक’ च्या वतीने मेंदूच्या क्रिया, ‘मेंदूंच्या अंतर्गाची ‘ तपासणी आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 371 रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरांतर्गत ब्रेनमॅपींग तपासणी 90 टक्के सवलतीच्या दरात करण्यात आली.  अशी माहिती ब्रेन फिजिओलॉजिस्ट व न्युरो फिडबॅक फिजिअशन डॉ. प्रशांत देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली.
हे शिबिर औंध येथील ‘ब्रेनमॅ्पींग इंडिया फोरम क्लिनिक’ मध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत अतिचंचलता (एडीएचडी), फिट येणे, फेफरे येणे (एपिलेप्सी), एकाग्रता शीघ्र संतापी, मतिमंदता अभ्यासात अडचणी येणार्‍या रुग्णांवर न्युरोफिडबॅक चिकित्सेवर  उपचार करण्यात आले.
  • डॉ. देशमुख या शिबिराबाबत बोलताना म्हणाले, “औषधोपचाराचे योग्य नियोजन केल्यास सुमारे 30 टक्के रुग्णांना लाभ झाल्याचे समोर आले आहे. तर 15 टक्के रुग्णांना स्वास्थ मिळाले आहे. अतिचंचलता, मिर्गी फिट, औटिझम, स्वमग्नता, निद्रानाश, चिंतारोग, डिप्रेशन, डोके दुखी, अभ्यासातील समस्या, औषध किंवा मादक पदार्थाचे व्यसन, ट्रॉमा ब्रेन इन्जुरी (मेंदूची दुखापत) यावर नियंत्रण आले आहे. तसेच उपचारामुळे क्रियशिलता वाढली, समस्या सोडविण्याची क्षमतेत वाढ झाली. आत्मबोध वागणुक सुधारली असून, विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे”
डॉ. प्रशांत देशमुख हे आंतरराष्ट्रीय न्युरोफिडबॅक रिसर्च सोसायटीचे सदस्य आहेत. तसेच त्यांनी 1194 मुलांना अतिचंचलता, अतिक्रोध, एकाग्रता नसणे, अभ्यासातील अडचणवीर संशोधन करुन 15 प्रबंध जागतीक संशोधन लेखामध्ये सादर केले आहेत. या अभ्यासाचा रुग्णांवर उपचार करताना लाभ होत आहे. न्युरो फिजिओलॉजिस्ट, न्युरो फिड़बॅक चिकित्सेवर कोणताही वैद्यकीय सल्ला व औधष उपचार सुरु करण्याच्या आधी डॉ. देशमुख यांचा सल्ला घ्या, असे आयएसएनआर युसए च्या वतीने कळविण्यात आले आहे.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.