Vadgaon Maval : पंढरपूरवारी अखंडपणे 50 वर्षे पूर्ण करणारे विणेकरी ह.भ.प.दत्तोबा विठोबा वाडेकर यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- राम कृष्ण हरि मंत्राचा जयघोष आणि विठ्ठल नामाचा जप करत श्री क्षेत्र आळंदी व पंढरपूरची आषाढी- कार्तिकी, मासिक अखंड पायी वारी करताना एका विणेक-याने पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल वारकरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह.भ.प.दत्तोबा विठोबा वाडेकर असे या वारक-याचे नाव आहे. तुकाराम महाराजांची गाथा, मानपत्र, सन्मानचिन्ह, राधाकृष्णाची मूर्ती, उपरणे, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

वाहनगाव या खेड्यातून पायीवारी करणाऱ्या वाडेकर यांचा वारकरी भूषण पुरस्कार प्रदान सोहळा व गावातील अध्यात्मिक व संप्रदायायिक क्षेत्रातील कार्याबद्दल बजरंग भजनी मंडळाचा गौरव करण्यात आला. वाडेकर यांचा सपत्नीक गौरव सोहळा गावकऱ्यांनी अनुभवला. यावेळी रामचंद्र महाराज तनपुरे मारूती वाडेकर ,सोपान कुडे ,नामदेव.वाडेकर धोंडिबा वाडेकर, सीताराम तनपुरे,विठ्ठल वाडेकर, मारूती बाबूराव वाडेकर, दत्तात्रेय वाडेकर, बाळासाहेब गायकवाड, नागेश वाडेकर, शंकर वाडेकर, चिंधू गोगावले,योगेश वाडेकर, अक्षय वाडेकर,प्रणव तनपुरे, लिलाबाई पवार, ठकुबाई तनपुरे,चंद्रभागा वाडेकर, चिंधाबाई वाडेकर,सावित्राबाई वाडेकर,ठकुबाई वाडेकर,तान्हाबाई वाडेकर या सांप्रदायिक क्षेत्रातील गुणीजनांचा ज्ञानेश्वरी, मानपत्र, सन्मानचिन्ह, राधाकृष्णाची मूर्ती, उपरणे,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

माजी उपसरपंच लहू वाडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी स्वागताध्यक्ष भूषविले. माजी सरपंच सुदाम वाडेकर, माजी सरपंच निवृत्ती वाडेकर,पोलीस पाटील साधना वाडेकर,ग्रामपंचायत सदस्या संगीता वाडेकर, बबन खंडागळे,बळीराम वाडेकर,दिगंबर कुडे,अरूण पवार,शिवाजी वाडेकर, चिंधाबाई वाडेकर, जयवंत मालपोटे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाबाजी वाडेकर, दशरथ वाडेकर, शाहीदास वाडेकर, सुधीर कुडे,अरूण पवार, शंकर वाडेकर, यांच्या हस्ते टाळ,विणा,मुदुंग, हार्मोनियमचे पुजन करण्यात आले. स्नेहा वाडेकर, लता वाडेकर, रंजना तनपुरे, जनाबाई कुडे,निशा कुडे या महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

काळूराम वाडेकर, अशोक वाडेकर, विकास खांडभोर यांनी शुभेच्छा दिल्या, रामचंद्र महाराज तनपुरे यांनी सत्काराला उत्तर दिले. सचिन वाडेकर यांनी स्वागत केले. भाऊराव वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. राजू वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. वासुदेव तनपुरे यांनी आभार मानले. माजी सरपंच जाखोबा वाडेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.