Vadgaon Maval: माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर वहिले यांचे निधन

Vadgaon Maval: Former Gram Panchayat member Sudhir Vahile passes away

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुधीर (अण्णा) बबनराव वहिले (वय 59) यांचे आज (गुरूवार) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

पूना सिम्सचे गुणवंत कामगार प्रसाद (बापू) वहिले व माजी उपसरपंच विशाल वहिले यांचे बंधू तर माजी सरपंच पोपटराव वहिले व माजी नायब तहसीलदार किसन वहिले यांचे ते पुतणे होत.

अंत्यविधी आज सकाळी 9:30 वा वैकुंठ स्मशानभूमी वडगाव येथे होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.