BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : अल्पावधीतच खवय्यांची शिवराज हॉटेलला पसंती

1,045
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- मागील काही महिन्यांपूर्वीच वडगाव मावळ येथे सुरु झालेल्या हॉटेल शिवराजच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बकासुर कडकनाथ थाळी, सरकार मटण थाळी, पैलवान मटण थाळी, मालवणी फिश थाळी, या स्पेशल थाळ्यानी खवय्यांची अल्पावधीतच मने जिंकली आहेत.

.

हॉटेल व्यावसायिक अतुल वायकर यांनी वडगाव मावळ येथे हॉटेल शिवराजचा शुभारंभ केला होता. आपल्या हॉटेलची रसिक खवय्या मंडळींमध्ये लोकप्रियता वाढावी या उद्देशाने त्यांनी नवनवीन कल्पना राबवित अल्पावधीत हॉटेलचे नाव सर्वांच्या ओठावर आणले. या ठिकाणी मिळणाऱ्या बकासुर कडकनाथ थाळी, सरकार मटण थाळी, पैलवान मटण थाळी, मालवणी फिश थाळी, या स्पेशल थाळ्यानी खवय्यांना तृप्त केले आहे. पैलवान थाळीमध्ये दोन जण, सरकार थाळीमध्ये पाच ते सहा जण, बकासुर कडकनाथ थाळीमध्ये पाच ते सहा व मालवणी फिश थाळीत दोन ते तीन लोकांचे पोट भरून जेवण होत असल्याने युवकांची या शिवराज स्पेशल मोठं मोठ्या थाळ्याना खूप पसंती मिळत आहे.

सोशल मीडियावर देखील शिवराज हॉटेलची क्रेज निर्माण झाली आहे. पार्टी, बर्थडे सेलिब्रेशन अशा छोट्या मोठ्या पार्टीसाठी शिवराज हॉटेलचीच निवड केली जात आहे. यामुळे दररोज शिवराज हॉटेलमध्ये खवय्यांची मोठी रीघ लागलेली असते. या हॉटेल मध्ये फॅमिलीसाठी विशेष बैठक व्यवस्था असल्याने सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लोक शिवराज हॉटेलला विशेष पसंती देतात.

उत्तम दर्जा व गुणवत्ता यामुळे अल्पावधीतच या चविष्ट थाळ्यांना खवय्यांनी पसंती दिल्याने मावळात शिवराज हॉटेलने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: