Vadgaon Maval : निर्भया चषक 2020 क्रिकेट स्पर्धेत येरवडा संघ प्रथम

एमपीसी न्यूज- महिला सबलीकरणाच्या उद्देशाने आयोजित केलेल्या निर्भया चषक 2020 क्रिकेट स्पर्धेत येरवडा संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला सुनील नाना भोंगडे माळवाडी संघ. तृतीय क्रमाक इंदोरी संघाने व चतुर्थ क्रमांक उर्से संघाने प्राप्त केला. शिस्तबद्द संघ म्हणून D11 कोटेश्वरवाडी या संघाची निवड करण्यात आली. 22 ते 26 जानेवारी दरम्यान हे स्पर्धा पार पडली. अभिजीत ऊर्फ टायगर भेगडे मित्र परिवारतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, तळेगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा ज्योती शिंदे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, माजी उपसरपंच प्रकाश हगवणे, मयूर नाटक, उदयोजक बाळा धामणकर, प्रशांत वाघमोरे, पृथ्वीराज मुऱ्हे उपस्थित होते.

यावेळी गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना मान्यवरांच्या हस्ते मावळ शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामन्याचे समालोचक म्हणून सुमित सोनवणे, नरेश ढोमे, दीपक राजगुरु, अतुल बनकर आदींनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.