Vadgaon Maval : ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण वैध ठरवले. महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले. (Vadgaon Maval) याबद्दल वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, मावळ तालुका काँग्रेस आयचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका ओबीसीसेल अध्यक्ष मंगेश खैरे, ओबीसी सेल महिला अध्यक्षा संध्या थोरात, माजी उपसरपंच विशाल वहिले, अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष आफताब सय्यद, (Vadgaon Maval) तालुका ओबीसी सेल वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, बाळासाहेब खंडागळे, तळेगाव शहर सचिव गोकुळ किरवे, तळेगाव शहर ओबीसी सेल अध्यक्ष स्वप्नील मावळकर, कान्हे अध्यक्ष सोनल आनंदे, वडगाव युवक माजी अध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, वडगाव उपाध्यक्ष नितीन धोंगडे, संजय लोणकर, नवलाख उंब्रे अध्यक्ष सुहास शेवकरी, वडगाव ओबीसी सेल महिला अध्यक्षा सुधा भालेकर, जयश्री पवार, निलिमा शिंदे, नलिनी गायकवाड, लक्ष्मी गजाकोश, मिना शिंदे, अशोक आनंदे, शरद ढोरे, भाऊ कराळे, सिद्धेश ढोरे, महेश तुमकर, अमित चौरे, राहिल तांबोळी, स्वप्नील पावसकर, केदार बवरे, सोनू भालेराव, किरण ओव्हाळ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.