Innerwheel Talegaon : इनरव्हील क्लबला वैद्यकीय साहित्य भेट

एमपीसी न्यूज – इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Innerwheel Talegaon) या सामाजिक संस्थेला प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब दाभाडे यांच्याकडून वैद्यकीय साहित्याचा संच भेट देण्यात आला.

 

अपघाती परिस्थिती, वृद्धापकाळामुळे किंवा सेमी पॅरेलिसिस मध्ये काही थोडक्या काळा पुरती वैद्यकीय उपकरणे हवी असतात. सगळ्यांनाच ती विकत घेणे शक्य नसतात अशा गरजू रुग्णांना ती अल्पभाड्यामध्ये उपलब्ध करून दिले जातील असे नवनिर्वाचित अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सांगितले. (Innerwheel Talegaon) तरी या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा तसेच यासाठी दानशुरांनी वैद्यकीय साहित्यरुपी या योजनेला साह्य करावे असे आवाहन केले.

 

 

या वैद्यकीय संचामध्ये रुग्ण उपयोगी व्हील-चेअर, डबल रेल्लिंग फोवलर बेड, कोमोड खुर्च्या,वॉकर्स व कोमोड स्टूल आदी साहित्य याचा समावेश असून, तो डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे व नवनिर्वाचित अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी अनुपमा दाभाडे व अण्णासाहेब दाभाडे यांच्याकडून स्वीकारले.

 

या वेळी समीर अण्णासाहेब दाभाडे, दत्तात्रय दाभाडे,नंदकुमार शेलार,माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे,विलासशेठ काळोखे,पिंपरी-चिंचवडचे माजी विरोधी पक्ष नेते दत्तात्रय वाघिरे,संगीता माई साळुंके,विलास जाधव,नगरसेविका मंगल भेगडे,प्राची हेंद्रे,शोभा भेगडे,छाया बापुसाहेब भेगडे, सचिव निशा पवार, उपाध्यक्षा संध्या थोरात, खजिनदार अनुप्रिया खाडे, आय एस ओ अर्चना देशमुख,संपादक दीपाली चव्हाण, (Innerwheel Talegaon) क्लब करस्पोन्डन्स जयश्री नामदेव दाभाडे तसेच रोटरी क्लब,लायन्स क्लब,शैक्षणिक संस्था,राजकीय पदाधिकारी व सर्व इनरव्हील माजी अध्यक्षा व सदस्या उपस्थित होत्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.