Vadgaon-Maval : शेतकऱ्यांनो ! वेळेवर कर्ज भरा आणि आपली पतपात्रता वाढवा, जिल्हा बँकेचे आवाहन 

एमपीसी न्युज : आपल्या उद्योग व्यवसायासाठी अनेक शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात. हे कर्ज शेतकऱ्यांनी वेळेवर फेडावे. त्यामुळे त्यांची पतपात्रता वाढणार आहे. (Vadgaon-Maval) वेळेत कर्ज फेडून शेतकऱ्यांनी बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी निरंजन पवार यांनी केले.

वराळे येथील रूडसेड संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोल्ट्री उद्योजक प्रशिक्षण कार्यशाळेत श्री पवार हे बोलत होते. यावेळी प्रशिक्षक संदिप पाटील, हरिष बावचे,दिनेश निळकंठ हे उपस्थित होते.

Women sexual aasualt : लैंगिक अत्याचार करत महिलेची तब्बल 66 लाखांची फसवणूक कऱणारे गजाआड

रूडसेड संस्थेचे संचालक प्रविण बनकर  यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेतील उद्योजकांना तज्ञ  प्रशिक्षक चंद्रकांत अपशिंगे,(Vadgaon-Maval) संघटक सोनबा गोपाळे गुरूजी,प्रविण बनकर  आदींनी मार्गदर्शन केले.

योगीता गरुड,रवी घोजगे यांनी प्रशिक्षण  कार्यशाळा यशस्वी करण्यासाठीविशेष  परिश्रम घेतले. पुणे,नगर जिल्ह्यातील 35 पोल्ट्री उद्योजक सहभागी झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.