Vadgaon Maval News: पर्व पर्युषण निमित्त ऑनलाइन स्तवन-भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण

लहान मुलांसाठी ऑनलाईन स्तवन-भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लहान मुलांनी यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होत, भजन म्हणून आयोजकांना व्हाट्सपद्वारे पाठविले.

एमपीसी न्यूज- जैन धर्मियांमध्ये अतिशय पवित्र समजला जाणाऱ्या पर्व पर्युषणची नुकतीच सांगता झाली. कोरोना महामारी तसेच लॉकडाऊनमुळे सर्वांनी हा सोहळा आपापल्या घरीच साजरा केला.

मात्र या निमित्ताने लहान मुलांसाठी ऑनलाईन स्तवन-भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लहान मुलांनी यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होत, भजन म्हणून आयोजकांना व्हाट्सपद्वारे पाठविले.

या भजनांतून भगवान महावीर स्वामी, 24 तीर्थंकर यांच्या आयुष्यातील जीवनप्रवास सांगण्यात आला आणि त्यातूनच विजेत्यांची निवड करून त्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.

ऑनलाइन स्तवन स्पर्धा निकाल-

प्रथम क्रमांक- खुशबू हर्षल बाफना
द्वितीय क्रमांक- विराज आशिष बाफना
तृतीय क्रमांक – मोक्ष राजेंद्र बाफना
चतुर्थ क्रमांक – मित संदीप ओसवाल
पंचम क्रमांक- क्रिशा आतिष कर्णावट

उत्तेजनार्थ-
नेत्रा अमित मुथा
इशांत सचिन ओसवाल
प्रज्वल हर्षल बाफना
काव्या सागर कर्णावट

विशेष प्राविण्य-
हितांश अमोल बाफना
साक्षी धीरज कोचर

याप्रसंगी आनंदराम मुथा, सुभाषचंद्र मुथा, डॉ. सुनील बाफना, अशोकलाल गुजराणी, झुंबरलाल कर्णावट, राजेंद्र बाफना, दिलीप मुथा, प्रदीप बाफना, भूषण मुथा, आदेश मुथा, वितराग मुथा तसेच पालक वर्ग आदी उपस्थित होते.

जैन सकल संघाचे सदस्य भूषण मुथा यांच्या संकल्पनेतून ही ऑनलाइन स्पर्धा राबविण्यात आली.

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तवन- भजन स्पर्धेच्या विजेत्या मु. अकोळनेर, अहमदनगर येथील नेहा बाफना यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. या अभिनव स्पर्धेबद्दल अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.