BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : बळीराजा पार्टीचे उमेदवार संभाजी गुणाट यांची निवडणुकीतून माघार

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभेचे बळीराजा पार्टी व अखिल भारतीय मावळ वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष संभाजी गुणाट यांनी माघार घेऊन राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

नवलाख उंब्रे ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी पुढाकार घेऊन बळीराजा पार्टीचे अध्यक्ष गणेश जगताप आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा चर्चा करुन पाठिंबा दिला.

यावेळी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष सुखदेव ठाकर, बाबाजीमहाराज काटकर, नारायण ठाकर, बाळासाहेब शेटे, अविनाश बधाले, नवनाथ पडवळ, बाबाजी पडवळ, सोमनाथ अडिवळे, गोपीचंदमहाराज कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement