Vadgaon Maval -विद्यार्थ्यांना मैदनावर खेळायला सोडून शिक्षकाने घेतली वामकुक्षी!

एमपीसी न्यूज – उकसान येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने ६ व ७ वीच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी गुरुवार (दि.१४) दुपारी २:५६ मैदानावर पाठवून सतरंजीवर झोपले होते. शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष नजाभाऊ इंगवले यांनी प्रत्यक्ष मोबाईलमध्ये झोपल्याचे फोटो काढून त्या शिक्षकाची झोप उडवली. त्यांच्या सहकारी शिक्षकांना हा प्रकार सांगितला. वसंत प्रभाकर भोसले असे झोपणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.

गुरुवार (दि.१४) पासून शाळेतच झोपणाऱ्या या शिक्षकाची चर्चा गावभर रंगली. काही ग्रामस्थांनी शिक्षक झोपण्याचा पगार घेतात का ? असा सवाल केला. ग्रामस्थांनी केंद्र प्रमुख यांना माहिती दिली असता, तुम्ही माझ्याकडे तक्रार द्या. अशी तंबी दिली.

या झोपणाऱ्या शिक्षकावर खरंच कारवाई होणार का? त्यांना अधिकारी पाठीशी घालणार अशी चर्चा रंगली आहे. नुकताच बालदिन असल्याने मावळ तालुक्यातील शाळेतील शिक्षक बालदिन उत्साहात साजरा करत असता, उकसान शाळेचा शिक्षक झोप काढत असल्याचे फोटो ग्रामस्थ एकमेकांना पाठवत आहेत.

मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख आदींचे काम तरी काय ? ग्रामस्थ भात पिक कापणी व झोडपणीच्या कामात व्यस्त असताना, शिक्षकाने ज्ञानदान न करता झोप काढत आहेत. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पण अचानक शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष नजाभाऊ इंगवले यांनी प्रत्यक्ष घटनेचा फोटो काढल्याने हि घटना उजेडात आली.

ग्रामस्थांचे लक्ष या शिक्षकावर कारवाई होणार का? याकडे लक्ष आहे. माजी उपसरपंच संतोष कोंढरे म्हणाले ग्रामीण भागातील पालक हा शिक्षकांच्या विश्वासावर मुले सोडत असून शिक्षकच झोप काढत असतील तर शासनाकडून अशा शाळावर कारवाई करावी. शिक्षकाला शाळेत झोपल्याचा जाब विचारणाऱ्या प्रतिष्ठित ग्रामस्थांना तुमची मुले या शाळेत नाही तुम्ही बोलायचे नाही असा वाद घातला. हे शिक्षकच या शाळेचे मुख्याध्यापक असून बाकी काय बोलू.

यावेळी गटशिक्षण अधिकारी मंगल वाव्हळ म्हणाल्या, संबंधित शिक्षक व केंद्र प्रमुख यांची चौकशी करून त्या शिक्षकावर कारवाई करणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.