Vadgaon Maval : उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे आवश्यक – नवाब मलिक

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. परंतु, त्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे होतकरू तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले.

वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष आफताब सय्यद यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री नवाब मलिक बोलत होते.

याप्रसंगी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हापरिषद सभापती बाबुराव वायकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष सुभाषराव जाधव, नगरसेवक गणेश खांडगे, माजी सरपंच तुकाराम ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष पूजा वहिले, तळेगाव नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा, नगरसेविका वैशाली दाभाडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, आयुब शिकिलकर, राजेश बाफना, नगरसेवक चंद्रजित वाघमारे, पूनम जाधव, प्रवीण ढोरे, सोमनाथ धोंगडे आदी उपस्थित होते.

नवाब मलिक म्हणाले, “उद्योगधंद्यात महाराष्ट्र अग्रेसर असून बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन उद्योगधंद्यात पुढे आणणे आवश्यक आहे. तरुणांनीही आधी उद्योग व्यवसाय करावा व मग राजकारणात यावे. शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून मुस्लिम समाजासाठी असणाऱ्या योजनाही अल्पसंख्याक बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी आमदार शेळके यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत कौशल्य विकासाअंतर्गत मावळ तालुक्यातील तरुणांसाठी प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री नवाब मलिक यांनी दिले.

आमदार शेळके यांनी यावेळी तालुक्यातील तरुण वर्ग उद्योग व्यवसायाकडे वळत आहे. परंतु, त्यांना योग्य प्रशिक्षणाची व पाठिंब्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. तसेच तालुक्यातील दफनभूमीच्या प्रलंबित कामांसंदर्भात प्रस्ताव देऊ, त्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.

बापूसाहेब भेगडे म्हणाले, तालुक्यातील मुस्लिम समाजबांधवांनी आजतागायत सामाजिक सलोखा राखला असून हा समाज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विचारसरणीचा असल्याचाही उल्लेख केला. तसेच वडगावसह तालुक्यातील इतर दफनभूमीच्या कामांसाठी निधी देण्याची मागणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.