Vadgaon Maval : बाळा भेगडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मंगळवारी भरणार कुस्त्यांचे जंगी मैदान

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा विश्वनाथराव भेगडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त होणाऱ्या, राज्यमंत्री चषक, भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवारी, (दि. 31 डिसेंबर) वडगाव मावळ येथे होत आहे. त्याचे भूमिपूजन मावळ भाजपचे माजी अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष पै रामनाथ वारींगे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ भाजप अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती निवृत्ती शेटे, गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य शांताराम काजळे, संभाजी टेमगिरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, संतोष कुंभार, अविनाश गराडे, संदीप काकडे, बाळासाहेब घोटकुले, बाळासाहेब शेलार, जितेंद्र बोत्रे, संजय पवार, सुनिल चव्हाण, रमण पवार, बाबूलाल गराडे, बाळासाहेब काळोखे, नामदेव भसे, सुधाकर ढोरे, गणेश कल्हाटकर, सचिन पांगारे, दिनेश ढोरे, संतोष म्हाळस्कर, महेंद्र म्हाळस्कर आदींसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम कदम यांनी केले. तर, आभार अनंता कुडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.