vadgaon News : कातवी पाणी पुरवठा योजनेचा वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी

नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या प्रयत्नांतून व विद्युत मंडळाच्या माध्यमातून 7 लाख रुपयांचे अंदाजपत्रकास जिल्हा नियोजन फंडातून मंजुरी

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक वर्षांपासून कातवी पाणी योजना इंदोरी फिडर वरून चालू होती. परंतू वाढत्या शहरीकरणामुळे तसेच मध्यंतरीच्या काळात वादळी पाऊस इत्यादी कारणांमुळे हा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत होता. त्यामुळे नगरपंचायत हद्दीतील कातवी गाव तसेच प्रभाग क्रमांक 16 व प्रभाग क्रमांक 17 येथील रहिवाशांना खंडित पाणीपुरवठा त्रासाला गेल्या पाच वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता.

नगरपंचायत स्थापन झाल्यापासून नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी सदर कामाची अडचण पाहून महावितरण मंडळाकडे वेळोवेळी पाठपुरावा चालू ठेवला व पत्रव्यवहार केला. त्यामुळे सदर कामाचे मोजमाप करून विद्युत मंडळाच्या माध्यमातून कामाचे 7 लाख रुपयांचे अंदाजपत्रकास जिल्हा नियोजन फंडातून मंजुरी देण्यात आली होती परंतू कोरोनाच्या काळात सदर कामास स्थगिती मिळाली होती.

_MPC_DIR_MPU_II

आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने दहा दिवसांपूर्वी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी नगरपंचायत येथे महावितरण विद्युत मंडळाचे अधिकारी व मुख्याधिकारी यांची मिटींग घेऊन सदर काम तत्काळ चालू करावे अशी मागणी केली.

त्यावेळी पुणे सर्कल विद्युत मंडळाचे डेप्युटी इंजिनियर सरोदे यांनी मावळचे उपअभियंता जाधव यांना काम करण्याचे तत्काळ आदेश दिले व त्यानुसार कातवी येथे सदर काम चालू झाले असताना प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, नगरसेवक राजेंद्र कुडे, विद्युत मंडळाचे जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कातवी पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लागल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.