Vadgaon : पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

एमपीसी न्यूज – समाजात घडणाऱ्या प्रत्येक (Vadgaon)घटनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अविरत काम करणाऱ्या पत्रकारांना मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

एमपीसी न्यूजचे पत्रकार प्रभाकर तुमकर, नवराष्ट्रचे सतीश गाडे, जेष्ठ पत्रकार विजय सुराणा, ज्ञानेश्वर ठाकर, गणेश विनोदे,सचिन ठाकर,सचिन शिंदे,संकेत जगताप, संजय दंडेल, महादेव वाघमारे, योगेश घोडके, अभिषेक बोडके आदिंना सन्मानित करण्यात आले.

Chinchwad : महाराष्ट्रात लोकगीतांवर आधारीत डीजे डान्स शो बंद करा-सुरेखा पुणेकर

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, (Vadgaon)तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ,मावळ तालुका राष्ट्रवादी सहकार सेलचे अध्यक्ष सुधाकर वाघमारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत, माजी नगरसेवक मंगेश खैरे, युवा नेते बाळासाहेब तुमकर, मयुर गुरव, पंकज भामरे, शिवसैनिक बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरु केले. दर्पणने मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली गेली. पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून उत्तम काम केले. त्यांच्या जयंती दिवशी पत्रकारिता दिन साजरा केला जातो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.