Tung Fort : पुरातत्त्व विभागाकडून तुंग किल्ल्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात (Tung Fort )असलेल्या तुंग किल्ल्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाकडून एक कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तुंग किल्ल्याच्या संवर्धनाची विविध कामे केली जाणार आहेत.

मराठ्यांच्या इतिहासात तुंग किल्ल्याची नोंद आहे. हा किल्ला शिवकालीन पराक्रमाची साक्ष देतो. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांची संख्या अधिक आहे. मागील अनेक वर्षांपासून किल्ल्याची पडझड पायऱ्यांची झीज झाल्याने किल्ल्यावर जाणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून दुर्गसंवर्धनाचे काम केले जाणार आहे.

Tata Pay : टाटा पेला रिझर्व बँकेची मंजुरी

गेल्या तीन वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठान मावळ मार्फत किल्ले (Tung Fort )तुंग उर्फ कठीणगडावर दुर्ग संवर्धनाचे काम अविरतपणे सुरू आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सातत्याने तुंग किल्ल्यावर संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत आणि किल्ले तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्प अहवालानुसार पुरातत्त्व विभागाकडून किल्ले तुंग येथे सुरू असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कामासाठी एक कोटी 56 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तुंग किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाची कामे पूर्ण झाल्यानंतर तिथे येणाऱ्या शिवभक्तांसाठी चांगली सोय निर्माण होणार आहे. तसेच हा किल्ला शिवकालीन पराक्रमाची साक्ष देत राहील. यामुळे शिवभक्त आणि दुर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.