Chinchwad : महाराष्ट्रात लोकगीतांवर आधारीत डीजे डान्स शो बंद करा-सुरेखा पुणेकर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सर्वत्र अल्पावधीतच लोकप्रिय (Chinchwad)झालेल्या आणि लोकगीते व बॉलीवूड गाण्यांवर चालणारे डीजे डान्स शो बंद करावेत, त्यामुळे लावणी लोक नृत्यावर परिणाम होत असून या क्षेत्रात काम करणार्‍या कलाकारांच्या रोजगारावर देखील परिणाम होतो आहे, असे मत ख्यातनाम लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले.

100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड (Chinchwad)येथे आयोजित करण्यात आले आहे, त्यानिमित्ताने भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या.

Pimpri : मित्राला मारहाण केल्याच्या गैरसमजातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला

सुरेखा पुणेकर म्हणाल्या, महाराष्ट्रात लावणीच्या नावाखाली डीजे शो आयोजित करण्यात येत आहेत. त्यामध्ये स्टेजवर मोठमोठे डीजे लावून भडक कपडे घालून डान्स करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात होत आहेत.

लावणी या लोकनृत्यामध्ये गायन व वादन प्रत्यक्ष मंचावर केले जाते हे लावणीचे वेगळेपण आहे. अश्लीलता लावणीमध्ये वर्ज्य मानण्यात आली आहे. डीजे शो चित्र विचित्र गाणी वाजविण्यात येतात. डीजे शो ही विकृती आहे, लोकांची गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत.
महाराष्ट्रातील लोकांनी अशा कार्यक्रमांना विरोध करावा असे आवाहन त्यांनी तरुणांना व लावणी प्रेमींना केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.