Talegaon Dabhade : डॉ. डी वाय पाटील इन्टिटयुटमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – वराळे येथील डॉ. डी वाय पाटील इन्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट (Talegaon Dabhade)या संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात दोन हजार 122 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यातील विविध भागातून उमेदवारांना रोजगार मेळाव्याला येता यावे यासाठी मोफत बसची सोय करण्यात आली होती.

शनिवार(दि.6) जानेवारी 2024 रोजी डॉ.डी.वाय.पाटील (Talegaon Dabhade)फेडरेशनचे,डॉ.डि. वाय.पाटील इन्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इंटरप्रेणीयर डेव्हलपमेंट या संस्थेमध्ये नोकरी/रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.

Tung Fort : पुरातत्त्व विभागाकडून तुंग किल्ल्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर

या मेळाव्यामध्ये एकुण 2 हजार 122 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 958 विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहिले होते. हा एकदिवसीय मेळावा हा अभुतपूर्व ठरला आहे.

सामाजिक बांधीलकी व समाजकार्य या भावनेतुन संस्थेचे अध्यक्ष डॉ सुशांत पाटील,सचिव ॲड.अनुजा सुशांत पाटील तसेच संचालिका डॉ.प्रियांका सिंग यांच्या संकल्पनेतुन या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्या करीता पुणे व परिसरातील 30 पेक्षा जास्त नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तळेगांव व परिसरातील बेरोजगार तरूण व तरूणींना रोजगार
मिळण्याकरीता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याकरीता उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना निःशुल्क बस सेवा पुरवण्यात आली होती.

रोजगार मेळावा यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ.एस.डी. शिरबहादुरकर,डॉ.प्रमोद पांडे,डॉ. सुरेश माळी, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर डॉ.सचिन आंबेकर,एम.बी. ए. विभाग प्रमुख डॉ. हरीनी राजन, एम.सी.ए.विभाग प्रमुख डॉ.अश्विनी चव्हाण तसेच संस्थेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.