Talegaon Dabhade : पत्रकार दिनानिमित्त तळेगाव शहरात विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने (Talegaon Dabhade)साप्ताहिक अंबर कार्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले. तसेच पत्रकार आणि पत्रकारिता याबाबत उपस्थितांनी उहापोह केला.

तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे वतीने साप्ताहिक अंबर(Talegaon Dabhade) कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांचे अध्यक्षतेखाली आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन पोलिस निरीक्षक भारत वारे यांचे हस्ते करण्यात आले.

Tung Fort : पुरातत्त्व विभागाकडून तुंग किल्ल्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर

या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे गुरूजी, बी.एम.भसे,अतुल पवार,प्रभाकर तुमकर,राजेश बारणे, राजेंद्र जगताप,तात्यासाहेब धांडे, श्रीकांत चेपे आदी पत्रकार उपस्थित होते.

यावेळी मेधाविन फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे,स्वाती पवार,स्वाती दाभाडे यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा देउन सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अशोक दाभाडे व सहका-यांनी यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना शुभेच्छा देउन सत्कार केला.शहरातील राजकीय पक्ष पदाधिकारी, विविध संस्था यांचे कडुन पत्रकारांना शुभेच्छा देउन ठिक ठिकाणी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.