Talegaon Dabhade : सद्गुरू हभप रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकातील (Talegaon Dabhade )श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने सदगुरू हभप रंगनाथ महाराज परभणीकर गुरूजी यांच्या पुण्यतिथि निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

श्री विठ्ठल मंदिरात पहाटे पुजा, काकड आरती,भजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदगुरू रंगनाथ महाराज परभणीकर यांचे प्रतिमेचे पूजन लक्ष्मण महादु भेगडे यांचे हस्ते करण्यात आले.

Talegaon Dabhade : डॉ. डी वाय पाटील इन्टिटयुटमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

यावेळी माजी उपनगराध्यक्ष रामदास गवारे(Talegaon Dabhade ),किरण गवारे,अतुल देशपांडे, विणेकरी संपतराव गराडे, ह.भ.प. निवृत्ती महाराज फाकटकर,पांडुरंग गदादे,सुभाष बेल्हेकर,छबुराव भेगडे, प्रकाश वालझाडे, हरिदास वनारसे,द्वारकानाथ थोरात,अरविंद हांडे पाटील, किशोर दरेकर आदीं भजनकरी उपस्थित होते तर श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे, ज्ञानेश्वर महाराज माऊली दाभाडे यांनी परभणीकर महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली.

या कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज दाभाडे,यतिनभाई शहा यांनी केले होते.महाआरती व प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.