Vadgaon News : मिंडेवाडीतील माता कांगाई देवीच्या मंदिरात देवीची प्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील युवा उद्योजक रणजीत रामदास काकडे यांनी कै. यशोदा महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ आर एम के इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. तर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिंडेवाडी येथे श्री कांगाई देवीचे मंदिर बांधले आहे. या मंदिरात सोमवारी (दि. 19) कांगाई देवीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी नवलाख उंब्रे गावचे माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, प्रभाकर पडवळ, उद्योजक संजय साने, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह व उद्योजक रामदास काकडे, चिंधू बधाले, रवींद्र बधाले, अरूण बधाले, सोपान बधाले, ज्ञानेश्वर बधाले, खंडू बधाले, देवीदास बधाले, अविनाश बधाले, निलेश बधाले, दत्तु बधाले व ग्रामस्थ उपस्थित होते.

हभप शंकर महाराज मराठे यांच्या हस्ते मंदिराचे ‘कळस’ पूजन करण्यात आले. श्री कांगाई देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आली.

उद्योजक रामदास काकडे यांनी मिंडेवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात शाळा, व्यायाम शाळा, गावठाण व स्मशानभूमी बांधून देण्याचा मानस व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी रामदास काकडे व परिवाराने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 38 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

मिंडेवाडीतील कांगाई देवीच्या मंदिरामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसेच कांगाई देवीची मिंडेवाडीतील ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक भक्त मनोभावे पूजा करतात. मंदिर बांधल्याने नागरिकांमध्ये उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.