Vadgaon News : तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदी निशा पवार

एमपीसी न्यूज – खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नवयुवतींचे संघटन बलशाली करण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पुजा बुट्टे पाटील यांनी निशा वैभव पवार यांची मावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली असून तसे निवडीचे पत्र दिले आहे.

युवती उपाध्यक्षपदी अमृता समीर नवले तर कार्याध्यक्षपदी प्रीती नाटक आणि तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदी शिवानी विजय सोनवणे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
निवडीचे पत्र तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते व आमदार सुनील शेळके आणि संत तुकाराम साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
त्यावेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस व तळेगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत, तळेगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा ज्योती शिंदे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे आदी उपस्थित होते.
या आधी निशा पवार यांनी तळेगाव शहर युवती अध्यक्षा म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पवार यांनी पक्षाचे उत्तम प्रकारे काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.