Vadgaon News : ‘सुधारित कृषी कायदे अदानी -अंबानींच्या फायद्यासाठी बनवले ‘

एमपीसीन्यूज : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कृषि कायदे बनविले नाहीत. केवळ अंबानी व अदानी यांना फायदा होण्यासाठी कायदे केले. यात एमएसपी, साठेबाजी व करार शेती यात शेतकरी संपवण्याचा कट आहे. या कायद्यांमुळे महागाई वाढणार असून नागरिकांचे जगणे महाग होईल. देशात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळत आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार, असा इशारा वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिला.

देशभरातील शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तसेच मोदी सरकारच्या शेतीविषयक कायद्यांच्या निषेधार्थ वडगाव मावळ शहर महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मंगळवार (दि.१५) एकदिवसीय उपोषण आंदोलन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, राहुल ढोरे, सायली म्हाळसकर, प्रमिला बाफना, माया चव्हाण, पूनम जाधव, पूजा वहिले, जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, माऊली दाभाडे, ॲड. मीनाक्षी ढोरे, राजू बाफना, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, नारायण ठाकर, मंगेश ढोरे, बाळासाहेब शिंदे, सरपंच दत्तात्रय पडवळ, प्रवीण ढोरे, मयुर गुरव, अतुल राऊत, सोमनाथ धोंगडे आदी उपस्थित होते.

या आंदोलनाला मावळ तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.