RT-PCR Testing Rate : कोरोना आरटी – पीसीआर चाचणीचे दर 700 रुपयांवर

एमपीसी न्यूज – कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य शासनाने कपात केली आहे. आरटी – पीसीआर आता 980 रुपयांऐवजी 700 रुपयांत करता येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात आहेत. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 4500 रुपयांवरुन आता 700 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवल्याचे राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून.

केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.